मेडीकल टूरीझमसाठी भारतात येणाऱ्या अमेरिकनांची संख्या बघून ओबामा अस्वस्थ झाले यात काही नवल नाही. 'सॉफ्टवेअर आऊटसोर्सिंग' च्या बाबतीतही ते असेच अस्वस्थ झाले होते. अमेरिकन सरकारचे दुटप्पी धोरण ही आता काही नवीन बाब राहिलेली नाही. शरद वर्देंच्या 'झुळूक अमेरिकन तोऱ्याची' या पुस्तकात अमेरिकन सरकारच्या आणि अमेरिकन जीवनातल्या विसंगतींची मस्त खिल्ली उडवली आहे. इच्छुकांनी हे पुस्तक मुळातून वाचावे.
बाकी रॉबीन कुक आता वाचावासा वाटत नाही. त्याची सगळी पुस्तके एकाच छापाची वाटतात.