वाचताना फारच अस्वस्थ व्हायला झालं, पण मी जेव्हा ओ ड्युड हे सदर लोकसत्तेत लिहित होते तेव्हा जे प्रतिसाद येत ते सगळे तरुण मुलांचे होते. अपवाद म्हणायला हवं का ते माहित नाही. कदाचित अमेरिकेतल्या तरुण मुलांवर असल्याने वाचत असतील, पण वाचत होते हे नक्की.
दुसरं मला नेहमी असं वाटतं निदान आमच्या सारखे परदेशात राहतात त्यांच्या मुलांच्या बाबतीत, इतकं स्पष्टीकरण देत बसावं लागतं एखाद्या लेखकाबद्दल किंवा प्रसिद्ध व्यक्तिच्या कार्याबद्दल सांगताना की आपला उत्साह नष्ट होतो