पालकांची मेहनत कमी पडते किंवा चुकीच्या दिशेने आहे. आम्ही आमच्या मुलाला कोणतेही व्ही. डी. ओ. गेम्स दिले नव्हते, तेव्हा तो खूप चिडायचा पण आता त्यामुळेच (अकरावीत आहे) वाचनाची गोडी लागल्याचं तो स्वतःच सर्वांना सांगतो. पुन्हा इकडे मुलांना पुस्तकं वाचून परीक्षा द्यायला सांगतात खूप शाळांमध्ये. शंभार गुण झाले की शाळेच्या वाचनालयात, बातमीपत्रात नाव येतं त्यामुळे मुलांना चांगलं वाचायची आवड निर्माण होते. या अनुकरणीय गोष्टी आपण न घेता नको त्या गोष्टींचं अंधानुकरण का करतो तेच समजत नाही.
"काही मैत्रिणींशी बोलताना आलेला अनुभव. जी. ए. वाचा म्हटल्यावर त्यांचे
लेखन निराशा आणणारे असते, निगेटिव असते म्हणून वाचत नाही म्हणाल्या. आता
बोला." - हे तर प्रत्येक बाबतीत. डोक्याला ताप नको म्हणतात. निरर्थक गोष्टींना विनोद मानून करमणुक करुन घेण्यापेक्षा सकस वाचावं असं कुणालाही वाटत नाही.
आम्ही दरवर्षी दोन एकांकीका करतो . एक गंभीर किंवा प्रायोगिक आणि दुसरी विनोदी. त्यातही आम्हाला गंभीर विषय का घेतो त्याचं स्पष्टीकरण करावं लागतं.