शुद्धिचिकित्सक हा त्याला माहीत असलेल्या शब्दांचे शुद्धीकरण करेल, पण व्याकरणाचे काय?  ते ज्याचे त्यानेच दुरुस्त करायला हवे. चा, मागील, पाठोपाठ आदी प्रत्यय आणि शब्दप्रयोगी अव्यये शब्दाला जोडून यायला पाहिजेत.  ती अनेकदा तशी नाहीत.  ब्रिटिशाऐवजी बिर्टिश, गणले ऐवजी गणल्या अशा काही चुका आहेतच. मुळात लेखाचा मथळा हाच अशुद्ध आहे.  मराठीत ग्रामवाचक पूर शब्दातला पू दीर्घ असतो. ही चूक लेखात अनेकदा झाली आहे. शुद्ध शब्द: मणिपूर.