शेवग्याच्या शेंगांचे 'शेंगोणे' (एक पातळ आमटीसदृश प्रकार) पाहिलेला आणि खाल्लेला आहे. पाठारेप्रभूंच्या परंपरागत जेवणात तो असतो. कायस्थांमध्येही नुसत्या शेंगांची चवदार आमटी करतात. मला वाटते गोव्याकडेही नारळाचा रस (दूध) घालून आमटी करतात. वरील कृतीमध्ये जाडपणा येण्यासाठी टोमॅटो घातलेला दिसतो. पुदिन्याचा वापरदेखील नवीन वाटला. एकदा करून बघायला हवे.