दोस्त हो! त्या वादळाची गोष्ट होती आगळी
उंच लाटा, क्रूर वारा, रात्र काळी, वेगळी
कोण आहे, कोण बुडला, हे कळेना घनतमी
रवी उदेला, त्या उजेडी, पाहिला अंधार मी