निर्जीव आणि तशा फारशा किंमती नसलेल्या वस्तूमध्ये जीव अडकण्याचे प्रसंग तसे दुर्मीळच.एखादी जुनी साडी, जुनी पुस्तके, यांची विल्हेवाट(डिस्पोजल) लावताना मन अगदी अलवार होऊन जाते. ही काठीची आठवणही तशीच, जखमेची वेदना कधीचीच संपून गेल्यावर नुसताच व्रण उरावा आणि त्याच्या स्पर्शानेही हुळहुळल्यासारखे वाटावे, अशी.