बऱ्याच वर्षांपूर्वी श्री माधव गडकरी लोकसत्तेचे संपादक असताना त्यांनी कचेऱ्यांतून कचेरीच्या वेळात होणाऱ्या सत्यनारायण पूजांविरुद्ध लेख लिहिला होता. त्यावरच्या पत्रव्यवहारात काही माहिती उघड झाली होती. त्यानुसार सत्यनारायणपूजा ही एकोणीसाव्या शतकात प्रथम बंगालमध्ये सुरू झाली. ती मुख्यतः ब्राह्म(बंगालीत ब्राह्मो)समाज या सुधारणावादी पंथाने सुरू केली. या पूजेमध्ये होमहवन,यज्ञयाग काहीही नाही. ह्या पूजेचा अधिकार कुणालाही, सर्व वर्णांना आहे. या पूजेला मुहूर्त लागत नाही. नैवेद्याचे, सोवळ्याओवळ्याचे फारसे अवडंबर नाही इ. इ.