देणे घेणे खाते लिहिणे बंद करू या
शुन्यामध्ये स्वप्न बघावे जपण्यासाठी
दरवळ घेउन आली, कानी कुजबुजली ती
रेतीवरती नाव लिहावे पुसण्यासाठी
व्यक्त कराया भाव मनीचे शब्द कशाला?
भाव तरल डोळ्यात दिसावे कळण्यासाठी
शस्त्र शिकारीसाठी तुजला हवे कशाला?
नजरेने नजरेस भिडावे फसण्यासाठी .... व्वा , मतलाही आवडला - दुहेरी काफियाकरता अभिनंदन !