हे पटले. अशी पात्रे आई,बाबा, काका, मामा, भाऊ यापैकी एक अथवा अनेक रूपाने भेटतच राहतात. जावे प्रेमीजनांच्या वंशा तेंव्हा कळे! कोकिळेपेक्षा यांच्यावरच बेचकीचा उपयोग करणे गैर ठरू नये! कारण तो कोकीळ त्याच्या प्रियेला साद घालत असतो. हे "जळावू ओंडके" मात्र त्याच प्रक्रियेत जाणून बुजून धूर करत असतात! हाऽ हाऽ हाऽ (प्रवासी महोदय, हलकेच घ्या!)
लेखक बिड्या घ्यायला गेला असतात त्याचे प्रेमपात्र येते तेंव्हा सफाईने दंतमंजन म्हणतो! ... आवडले! लेखकाची लपवून ठेवायची सवय आणि खुबी दिसून येते. पण त्याचे प्रयत्न निष्फळ असतात हे शर्वरीच्या आणि त्याच्या आईच्या संवादावरून दिसून येते.
चौथ्या भागात संवाद जरा जास्त वाटले.
कथामालिकेचे मुख्य सूत्र "लेखकाचे शर्वरीचेबद्दल व्यक्त न झालेले प्रेम" हे आहे असे वाटते.
त्यादृष्टिने "गणेशोत्सव" आणि "देखणी कुत्री" चे कथानक घुसडल्यासारखे वाटले. "देखणी कुत्री" हि एक वेगळी कथा होऊ शकली असती.
एकूण पाहता कथामालिका आवडली. तुमची लेखनशैली आवडली. मालिका लवकर संपली. सोसायटीमध्ये अजून बऱ्याच घटना घडतात. त्यांचे पण असेच रंगतदार आणि खुसखुशीत वर्णन करता आले असते. तेंव्हा गणेशोत्सव आणि कुत्री मालिकेचा भाग होऊ शकले असते असे वाटते.
ही माझी वैयक्तिक मते आहेत. (हट्ट, दाब, दबाव, दम यापैकी काहीही नाही.)