प्रेम उमलता, मस्त कलंदर "निशिकांता"चे
डोळे होती ओले कोणी पुसण्यासाठी

आनंदाचे वेष्टन आहे पांघरले मी
दु:ख जन्मले "निशिकांता"चे लपण्यासाठी

काय जगी जगण्याला आहे "निशिकांता"रे
श्वास रुकेना काय करू मी? मरण्यासाठी

भार नसावा कोणावरती "निशिकांता"चा
खोद कबर तू अपुल्या प्रेता पुरण्यासाठी                          ... हे विशेष आवडले - तुमच्या प्रयोगशीलतेचं कौतुक वाटतं, शुभेच्छा !