मलाही लेखातले विवेचन पटले नव्हते. पण पुरावे उद्धृत करून लिहायचे म्हणजे खूप मोठी शोधाशोध आणि लिखापढी. कारण वाचलेले सर्वच साहित्य संग्रही नसते किंवा त्याची टिपणे ही नसतात. विकीवरची भारतीय संस्कृती, साहित्य, इतिहास याविषयीची भाष्ये अगाध आहेत.उपनिषदे ही सर्वसाधारणपणे वेदांच्या नंतरची असे सर्वसाधारण मत आहे. भाषाशास्त्रानुसार ऋग्वेदातील आर्ष संस्कृतचा काळ हा इतर वेदांपेक्षा खूप आधीचा ठरवला गेला आहे. जातिव्यवस्थेची गुंतागुंत समजून घेताना भल्याभल्यांची मती गुंग झालेली आहे. तेव्हा सरसकट आणि सरधोपट विधाने टाळावीच.तसे तर भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्याकाळी जन्मजात जातिसंस्था दृढमूल असल्याचे संकेत मिळतात.मनुस्मृतीच्या काळात तर नक्कीच.