द्ध हे जोडाक्षर द् + ध असे झालेले आहे. ते 'द्ध' असे लिहावे. वरील लेखात ते सर्वत्र 'ध्द' असे चुकीचे उमटलेले होते. ते आता सर्वत्र दुरुस्त केलेले आहे. शुद्धिचिकित्सकाचा वापर करताना अनेक ठिकाणी हे बदल आपोआप सुचवले जातात (उदा. पध्दती - पद्धती ), ते पाहून योग्य तेथे बदल करावे.