लेखातल्या प्रत्येक वाक्याचा प्रतिवाद करणे तार्किक दृष्ट्या शक्य आहे पण वेळखाऊ म्हणून शारीरिक दृष्ट्या शक्य नाही.
अगदी!
चव्हाण, कदम, भूमिती इ. शब्दांच्या दिलेल्या व्युत्पत्ती अजब आहेत.
'अजब' या शब्दाबद्दल आक्षेप नोंदवू इच्छितो. फारच सौम्य शब्द आहे. 'काहीच्याकाहीच' हा पर्याय कदाचित अधिक समर्पक ठरला असता. कृपया शब्दयोजनेबद्दल फेरविचार व्हावा.
(फारा वर्षांपूर्वी, पुण्यात स्थायिक असलेल्या एका 'शेट्टी'उपनामधारक बाईंनी, "आमचे पूर्वज 'शेती' करायचे म्हणून आमचे कुलनाम 'शेट्टी' पडले" अशी व्युत्पत्ती ऐकवून आमची विकेट काढली होती, त्याची आठवण झाली.)
नाही म्हणायला, "मी माझ्या क्षमतेनुसार हे समजलो आहे" असे डिस्क्लेमर पुढे टाकलेले आहे, पण तरीही.
एकंदरीत, या व्युत्पत्त्यांबद्दलच्या समजण्याच्या क्षमतेवरून लेखातल्या इतर मुद्द्यांबाबतही समजण्याच्या क्षमतेबद्दल नाना शंकाकुशंका मनात प्रवेश करून जात्या झाल्या. उर्वरित लेखास वाचण्याचे कष्ट घेण्याचा विचार सोडून द्यावासा वाटला (आणि देण्यात आला).
बाकी चालू दे असेच म्हणावे झाले.
"बाकी चालू दे" असे म्हणण्याने किंवा न म्हणण्याने नेमका काय फरक पडावा, हे कळले नाही. "बाकी न चालू दे" म्हटल्याने बाकी चालायचे बंद होणार आहे काय?
उलटपक्षी, "बाकी चालू दे" असे म्हटल्यावाचून बाकी चालण्याचे काही अडणार आहे काय?
हे असेच चालायचे! (पुण्यातल्या कुठल्यातरी रिक्षावर कधीतरी वाचलेले वाक्य.)