लतापुष्पा व टग्या  तुमचे मनापासून स्वागत. तुमचा प्रतिसाद हा प्रकार पोलिसाचा असतो तसाच आहे. मुद्दा समजून घेण्याची पद्धत तर खास पुणेरी आहे, ती कशी तर मुद्दा समजून न घेता समोरच्याला आधी मूर्खात काढणे, मग मुद्दा डोक्यावरून जात असेल तर शाब्दिक व्याकरण  शुद्धता वगैरे  वाद घालून दुसऱ्याला वेडे ठरवून आपण कसे व किती शहाणे आहोत हे दाखवायचे.

तुम्ही लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणाचे पदवीधर आहात हे सिद्ध केलेत.

प्रशासकाने किती सहज शब्दात माझी चूक काय, ते बरोबर कसे असावे हे दाखवून दिले. अशी माणसे समाजात मोठ्या संखेने असावी म्हणजे मराठी भाषा व लिखाण सुधारणे शक्य होईल.एखादे मत व मुद्दा हा प्रकार मत स्वातंत्र्याचा भाग आहे म्हणूनच मी तुमचे आधी स्वागत केले. तुमची ही प्रतिसाद देण्याची  पद्धत बदलावी अशी अपेक्षा करतो. नुसती शारीरिक कारणे दाखवू नका. अक्षेप असलेले शब्द दाखवताना योग्य शब्द कोणता असावा हे दाखवण्याची क्षमता असेल तरच तुमचा अक्षेप योग्य आहे, नाहीतर टगेगिरी अजून काय?