आरसा बघण्यास तुजला का असा सोकावला?
त्यापुढे पदरास ढळत्या सावरावे तू जरा
रात्र काळोखी पसरली चालता घे काळजी
वाट दिसण्या, काजव्यांना बाळगावे तू जरा
- छान.
तुजसवे जवळीक करण्या बघ हवा सरसावली
रेशमी काळ्या बटांना आवरावे तू जरा
निशिकांतजी, 'तुजसवे' चा अर्थ तुझ्यासोबत, तुझ्याबरोबर, 'अलाँग वुइथ यू' असा होतो, 'तुझ्याशी' असा नाही. हवा तिच्या सोबतीने कुणा तिसरीशी जवळीक करण्या सरसावली असे तुम्हाला निश्चित म्हणायचे नाही. तेव्हा ह्या द्विपदीच्या पहिल्या ओळीचे पुनर्लेखन करावे.