हा असहायता आणि हतबुद्धता यातून आलेला पलायनवाद होता इतकेच. प्रतिवाद करावा तर टंकता टंकता कळफलक आणि हाताची बोटे झिजून जातील. आंतरजालावर लिहिण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. लिहा काय हवे ते, आम्ही काहीही करू शकत नाही. उघड्या डोळ्यांनी ते वाचण्यापेक्षा आता पळ काढावा हे बरे, मग तिकडे तुमचे काहीही चालू दे वगैरे वगैरे.