तुमचे हे रुप खूप आवडले. माझ्या झालेल्या चुका समजवून दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद. आजवर मी असे चुका करून मित्र मिळवले व त्यातून मराठी कसे लिहितात हे शिकलो आहे. आज हिच परिस्थिती आहे खरे काय हे कसे समजणार कसे व कशावर विश्वास ठेवायचा. पोटा करता भटकताना इंग्रजी, हिंदी, फारसी, अरबी भाषा शिकलो, शिकताना शब्दांचे साम्य व अर्थ सगळा गोंधळ माजला आहे. मला पटलेले मुद्दे मला माझ्या अनुदिनीत माझ्या शब्दात प्रकाशीत करताना मी मनोगतचे शुद्धलेखन चिकित्सा वापरतो, त्यातून बरीच मदत होते, पण शब्द कसे कळणार?
मी मायक्रोफोन करता शब्द शोधला मला ध्वनी संवर्धक असा शब्द मिळाला, कर्याप्रमाणे तो शब्द ध्वनी प्ररिवर्तन कारणारा ध्वनी प्रवर्तक होणार असे माझे मत झाले. ऍम्प्लीफायर = ध्वनी संवर्धक हे साजेसे आहे. असे बरेच शब्द माझे मीच बनवले आहेत. ह्या दुव्याला कृपया भेट द्या व सांगा त्यात काय सुधारणा करता येतील.
पुन्हा एकदा धन्यवाद.