मेहदी हसन च्या 'एक खलिश को हासिले-उम्र-रवा रहने दिया' या गझल मध्ये तुमच्या यक्षप्रश्नाचे उत्तर आहे -
अपने अपने हौसले और अपनी तलफ की बात है,
चुन लिया हमने उसे (अर्थात चहा) सारा जहा रहने दिया!
अवांतरः एकहार्ट नावाचा एक पाश्चात्य विचारक असले प्रश्न उभे करणे आणि त्यांची इन्स्टंट उत्तरे देउन तुम्हाला तणावमुक्त करणे यात दादा माणूस आहे. उदा. एकसंध मानवतेत असे तीन तीन विपर्यस्त विचाराचे (चहा घ्या, मुळीच घेउ नका आणि मी घेणारच) वर्ग असणे हीच आजवरच्या मानवी सामाजिक इतिहासाची एक शोकांतिका आहे. तुम्ही आधी स्वतःला तिन्ही वर्गापासून मोकळे करा, जे इथल्याइथे आणि विनाप्रयत्न शक्य आहे. तुम्हाला उत्तर मिळालेलेच असेल. आणि अर्थातच त्या उत्तरानुसार तुमच्या पुढे वाफाळणार्या चहाचा कप आपसूकच आलेला असेल (अथवा नसेल)!
अतिअवांतर: चहा हवा असे उत्तर आले आणि समोर कप नसेल, चहा नको असे उत्तर आले आणि समोर कप आला तर आपण बुद्धिमत्ता न वापरता खालच्या पातळीच्या मनोव्यापाराने उत्तर शोधले असे समजून मोकळे होण्याचा प्रयत्न चालूच ठेवावा लागेल.