चहा हा आता कांही टाकाऊ राहिलेला नाही. किंबहुना, साखरेचा माफक उपयोग करून केलेला चहा चांगलाच मानवतो.
आमची आई सांगायची की इंग्रजांनी सुरुवातीला चहा येथील जनतेच्या गळी उतरवण्यासाठी चौकाचौकात टेबले मांडून फुकट चहा वाटला होता. तेव्हा बघ्यांचे कोंडाळे चहा घेणाऱ्याकडे फार विचित्र नजरेने पाहात असे. चहा घेणाऱ्याचेही तोंड बघण्यासारखे होत असे !
रेल्वे इंजीन पाहून धूर ओकणारा राक्षस आला, असे म्हणत घावरून पळणाऱ्या लोकांचे ते दिवस होते.