माधुरी व मीराताई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मालत्या व नखुल्या वगैरे गव्हल्यांकरता भिजवलेले पीठ आहे त्याच्याच बनवतात पण ते हाताने वळून नाही तर सहाणेवर पिठाची एक छोटी गोळी ठेवून बोटाने दाब देऊन वेगवेगळे आकार बनवतात. मालत्या थोड्या गव्हल्यांसारख्याच दिसतात पण त्याला थोडा पीळ असतो आणि नखुल्या पण छोटी गोळी सहाणेवर ठेवून नखाने बहुतेक शिंपल्यासारखा असा काहीतरी आकार देतात. मी आईला विचारून सांगेन अजून कोणकोणते प्रकार असतात ते आणि लग्नात मुलाच्या आईची गव्हल्यांनी ओटी भरायची असते असे वाटते. गव्हले म्हणजे खूपच वेळमोडे काम आहे हे. बोअर