उत्प्रेक्षा ह्या नावाचा एक अलंकार आहे असे शाळेतील व्याकरणात शिकल्याचे आठवते. जणू, भासे, गमे असे शब्द आले की उत्प्रेक्षा अलंकार असा ठोकताळा लक्षात ठेवल्याचेही स्मरते. शिवाय उपमा, उत्प्रेक्षा, रूपक ह्या तीन अलंकारात उपमेय आणि उपमान यांच्यातील साधर्म्य पायरीपायरीने वाढत जाते असे पण शिक्षकांनी सांगितले होते असे वाटते. तर ह्या उत्प्रेक्षेचा आणि आपण वर म्हटले आहे त्यानुसार अंदाज किंवा औदासिन्य यांचा काही संबंध आहे का आणि असल्यास कसा?