मखमली नजरेत तुझिया चांदणे दिसते मला
प्रेमभावांना धुमारे लागले फुटण्यास का?

कल्पना आवडली पण "...लागले फुटण्यास" हे बरोबर वाटत नाही. 'फुटू लागले' किंवा  फुटावयास लागले' ह्या अर्थाने "लागले फुटण्यास" चालते का ह्याविषयी कुणी जाणकार खुलासा करेल काय?

आठवांच्या मोसमाला पालवी फुटली अशी !
आज कळले आसवांना धाडले झरण्यास का?
- छान. दुसऱ्या ओळीनंतर प्रश्नचिन्ह का? ते विधान आहे ना?


"गावले" विषयी सतीश व महेश ह्यांच्याशी सहमत.