लग्नाआधी  खिरी करण्यासाठी जे पाच पदार्थ वळून तयार ठेवायचे असतात ते असे:
(१) गव्हला(पु.)( अनेकवचन- गव्हले) (२) मालती(स्त्री)(मालत्या) (३) नखोला(पु)(नखोले) किंवा नखुली(स्त्री)(नखुल्या) (४) बोटवा(पु)(बोटवे) (५) बहुगुला(पु) (बहुगुले).

याबद्दलच्या श्लोकात पांचापैकी तीन पदार्थ आले आहेत.

साळी शुभ्र सुवास ओदन वरी पीतें वरान्‍नें वरीं ।
क्षीरीं मालती बोटवे बहुगुले क्षिप्रा अनेकापरी ॥
चीसी साखर पांढरी मगदुमी तैशीच नाबद्दरी ॥।
आंब्याचे रसे पीवळे शिकरणी नाना मधुरावरी ॥॥

अर्थ स्पष्ट आहेः ओदन=भात, वरी=वरतीं, वरान्‍न=वरण, वरीं=पर्यंत(आठवा : जंववरीं रे तंववरीं  जंबूक करी वल्गना, जंव त्या पंचानना देखिले नाहीं रे बाप! ), क्षीर=क्षिप्रा=खीर, चीसी=जिची सासणी म्हणजे पाक करता येतो अशी, मगदुमी=एक प्रकारची साखर(? ), नाबद्दरी=खडीसाखरेपासून केलेली; नाबदार=खडीसाखरेचा ढीग, शिकरणी=शिकरणचे अनेकवचन---अद्वैतुल्लाखान