विष्णुसहस्रनामात नावांची खोगीरभरती आहे. अनेक नावे दोनदोनदा आहेत. उदा० विष्णु हे नाव १४व्या श्लोकात आहे आणि ४१ व्या. गोपति आणि गोप्तृ ६६व्या आणि ७६ व्या श्लोकांत.
शंकराची महादेव, शिव, शंभु, ईश्वर, हर वगैरे नावे, तर ब्रह्मदेवाची विश्वकर्मा, क, स्वयंभुव, धात्र वगैरे, रुद्राचे महास्वन, तर इंद्राचे समितिंजय हीही नावे आहेत. त्यामुळे विष्णुसहस्रनामातली औषध व भेषज(म्हणजे परत औषध), आणि वैद्य व भिषक् ही नावे शंकराचीही असल्यास नवल नाही. भिषक् हे भिषज्चे प्रथमेचे रूप आहे, हे सांगायला नकोच. म्हणूनच चांगल्या वैद्याला भिषग्वर म्हणतात.
त्या निमित्ताने विष्णुसहस्रनाम परत वाचायची संधी दिल्याबद्दल आभार.