आपण 'अधिकार' शब्दाचे महत्त्व ओळखले आहे जे पुष्कळश्या लोकांनी ओळखलेले दिसत नाही. थोडीशी भर म्हणा अथवा अर्थभेद म्हणा सुचवावासा वाटतो. इथे अधिकार शब्दाचा अर्थ 'जुरिस्डिक्शन' असा काहीसा असावा. (योग्य )कर्म अथवा कर्तव्य करणे हाच तुझा प्रांत अथवा क्षेत्र आहे. तुझ्या कामाचे परिणाम काय होतील अथवा काय असावेत हे ठरवणे तुझ्या हातात नाही. फळाची अपेक्षा (तुला हवी तर) ठेव बापडा, पण तुझ्या अपेक्षेप्रमाणेच घडवून आणणे, हे तुझ्या प्रांताबाहेरचे आहे.
पण कृष्ण इथेच थांबत नाहीत. ते पुढे म्हणतात, कर्मफळाचा हेतू बाळगणारा असा (जरी ) तू न व्हावेस, तसेच नैष्कर्म्यामधेही तू रमू नयेस. इथे अकर्मण असा शब्द व्यासांनी वापरलेला आहे. नैष्कर्म्य आणि अकर्मता यात थोडासा फरक आहेच. कर्मफळाचा हेतू नसला तरी 'फळ मिळणार नसेल तर मी काहीही काम करणार नाही' ही वृत्ती तू बाळगू नयेस असेच भगवंत स्पष्टपणे सांगतात.
वाचनातून निसटलेला धागा आपल्या प्रतिसादामुळे वर आला आणि वाचन शक्य झाले. धन्यवाद.