कर्म करताना मनात काही हेतू असू शकतो. पण जर केलेले कर्म हे कर्तव्यभावनेने केले तर असलेला हेतू हा फक्त हेतूच असतो. काही तरी इच्छा धरून केलेले काम होणार नाही. मला या प्रतिक्रिया वाचून एवढाच बोध झाला.
पुनर्जन्मा बद्दल आपल्याला काहीच समजत नाही पण जर त्या भीतीने माणूस नीतीने वागेल असे वाटते. पण मला वाटते आपल्याला सायन्स मध्ये सांगतात त्यावरून नेहमीची सर्व कामे लहान मेंदू करतो त्याशिवाय मोठा मेंदू पण असतो. पण त्याबद्दल फारशी माहिती नाही. कदाचित ठराविक काळानंतर तो सर्व आठवणी कदाचित साठवत असेल .