विष्णुसहस्रनामात भिषक् ह्या शब्दाने  काय अर्थ अभिप्रेत आहे हे नक्की  माहीत नाही, पण त्याचा अर्थ 'भीतीरूपी आजार नष्ट करणारा' असा असण्याची शक्यता कमीच.. सज्(किंवा संज्)(१ प) म्हणजे चिकटणे. अभि+सज्=अभिषज् म्हणजे, मलमपट्टी करणे. काही कारणाने 'अ' गळाला, भिषज् राहिला.  भिषज्‌=वैद्य. यावरून आलेले शब्द :
भिषक् = समासात भिषज् ऐवजी येणारा शब्द.  उदा० भिषक्चक्र. शिवाय, भिषज्‌चे प्रथमा विभक्तीचे एकवचनी रूप. अर्थ वैद्य.
भिषग्= हाहा समासामध्ये भिषज् ऐवजी येणारा. उदा० भिषग्वर. वाच् ऐवजी वाक् आणि वाग् असेच येतात. जसे, वाक्चातुर्य, वाग्गंगा.
भैषज(विशेषण)=गुणकारी, बरे करणारे(औषध वगैरे).
भैषजम्‌(नाम)=औषध
भैषज्य(धातू)=  रोगमुक्त करणे
भैषज्य(विशेषण)=गुणकारी(औषध), दुखणे बरे करणारा(वैद्य)
भैषज्यति( तृ. पु. ए. व. क्रियापद)= रोगमुक्त करतो.

यांत कुठेही  भीती हा अर्थ  आलेला दिसला नाही.  --अद्वैतुल्लाखान