१) मराठी माणसाची लॉबी असावी काय याला उत्तर होय असे द्यावे असे वाटते. पण जरी लॉबी असली तरी ती स्वसंरक्षणासाठीच. तिचा उपयोग दुसऱ्या भाषेवर अत्याचार क-ण्यासाठी नको.
२) मुंबईचा विकास करण हे काही फक्त मराठी माणसाची मक्तेदारी नाही. ही भारतभूमी मातृभूमी वाटणारे जरी परप्रांतीय असले तरी ते सुद्धा विकासाला हातभारच लावतील.
३) मुंबईत मराठी माणसासाठी राजधानी आहे त्यामुळे मुंबईत मराठी भाषेचे वर्चस्व असणे स्वाभाविक आहे म्हणूनच ते असावे. असे मला वाटते. पण वर्चस्व असणे म्हणजे इतरावर दादागिरी करता येणे नव्हे. म्हणजे जो या मातीत वाढला व ज्याने येथील संस्कृती स्वीकारली तो जरी परप्रांतीय असला तरी तो येथलाच होईल.
४)मराठी शाळा टिकून राहण्या साठी रोजच्या व्यवहारात मराठीला महत्त्व यायला हव. त्या साठी न्यायालयापासून कोणत्याही सरकारी कामात मुख्यत्वे करून मराठीत करता आले पाहिजेत. तसेच बँकेतील खाती उघडतानाच नव्हेतर सर्वच फॉर्म भरताना नुसते मराठीतील फॉर्म असावेत. व मागणीच केल्यास फॉर्म साठी पैसे लावून इंग्रजीतील फॉर्म मागे देवनागरीतील (हिंदी) द्यावा. म्हणजे मराठी माणूस तरी मराठीत फॉर्म भरेल. असे करत असतानाच जेथे तेथे इंग्रजी भाषेचे वाढवलेले महत्त्व नाहीसे होईल. तरीही परदेशी कंपन्यांत सुद्धा मराठी शाळांतून आलेला मुलगा/मुलगी सुद्धा व्याकरणशुद्ध व उत्तम रीतीने इंग्रजी बोलुसुद्धा शकेल यासाठी मराठी शाळानीसुद्धा कंबर कसली पाहिजे.
५) मुंबईतला परप्रांतीयाचा भार हा जर त्याच्या प्रांतात चांगला उद्योग मिळाला तर कमी होईल किंवा आपली मराठी माणसे त्याच्यापेक्षा सरस ठरतील असे वातावरण झाले तर होईल.