श्लोकातला पहिला शब्द कस्त्वं असावा. त्याऐवजी कस्वं उमटले आहे असे वाटते. 'पशुपतिर्नैव' हा बहुधा एक शब्द असावा.

श्लोकात आलेला भिषजं हा शब्द शंकर या अर्थाने नाही तर वैद्याला या अर्थाने आलेला दिसतो आहे. जरी श्लोकावरून भिषज हे शंकराचे नाव आहे असे सिद्ध होत नाही तरी, एकूण श्लोक  मनोरंजक आहे. निदान या श्लोकाच्या निमित्ताने शंकर आणि भिषज यांचा संबंध आला. 

लेखिकेला समर्पक श्लोक आठवला हे विशेष आहे.