यावर असे म्हणावेसे वाटते की न्यायाची बूज राखण्यासाठी, राष्ट्रपतीनी  आपल्या 'भारतभर चालत राहणाऱ्या दौऱ्यातल्या , वेळ-काढू धोरणा'तून,    ' पुरेसा वेळ ' दयेच्या अर्जावरील 'महत्वाच्या पण अति-प्रलंबित निर्णयां 'साठी,   अतिशीघ्रतेने काढावा! राष्ट्रपतींच्या प्रलंबित निर्णयामुळे अंतिमत: आमचाच पैसा गुन्हेगारांच्या 'पालन-पोषणा 'त खर्च होत आहे, हेही दुर्लक्षून चालणार नाही!

सहमत आहे!

              त्या क्रूरकर्मा निर्दयी कसाबाला फासावर लवकरात लवकर लटकलेले पहायला साऱ्या जगातल्या भारतियांचे डोळे लागून राहिले आहेत हो

२००९ पर्यंत लोक अफजल गुरू विषयी असेच बोलत होते... कसाब आल्यावर अफजलला विसरला का काय? आजून काही वर्षानी कोणी अतिरेकी सापडला की कसाबलाही विसरू आपण...

भुल्लरचा गेल्या साडेसात वर्षात काही निकाल लागला नाही पुढच्या ७-८ वर्षात तरी लागेल की नाही हे सांगता येत नाही. त्या मुळे कसाब तुमच्या आमच्या पैश्यावर आजून किती वर्षे सरकारी बिर्याणी झोडणार आहे काय माहीत.

मी असे ऐकले होते की राष्ट्रपतींकडे ज्या क्रमाने माफीचे अर्ज येतात त्याच क्रमाने त्यावर निर्णय घेतला जातो. त्यात अफजल चा नंबर २० च्या आसपास आहे. आणि कसाबचा ४५ च्या आसपास. (जाणकारांनी प्रकाश टाकावा.)

या विलंबाने अफजल किंवा कसाबचा नंबर (त्यांच्या) या जन्मात तरी लागणे अवघड दिसतय. एक तर ते आपला सरकारी पाहुणचार झोडूनच इहलोक त्यागतील किंवा मग एखादे कंदहार सारखे प्रकरण होउन त्यांना सन्मानाने पाकिस्तानात सोडून यावे लागेल.