आपले भ्रष्टाचारा बद्दलचे विचार वाचले. होय आपणच थोडेफार त्याला जबाबदार असतो. पण मुळात पैसे दिल्यावरच काम होते हे दिसुलागल्या खेरीज कोणी आपणहून पैसे द्यायचे नाव काढले नसेल.

आता हे इतके जगजाहीर झाले आहे त्यामुळेच पटवण्याचे सुचू लागले. हे जरी खरे असले तरी मुळात भ्रष्टमार्ग सुरू कसा झाला असेल तर मला वाटते मुळातच सरळ मार्गाने काम चटकन होणार नाही याची व्यवस्था केल्यावर.

आज आपल्याला सरकार काय सेवा देते, व त्यासाठी आपल्याकडून काय काय रूपाने कर आकारणी करते. आज आपण इतके कर कळत नकळत (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर) भरत असतो त्यामुळे मला वाटते जर कोणाला मनापासून कर भरावा असे वाटत असले तरी तो सध्याचा काळात कोठे तरी चुकलेला असेल व ती बातमी वाचून आपण त्या माणसाला करचुकवा म्हणू.

पण जर सरकारला भ्रष्टाचार थांबविता येत नसेल तरी यापुढील काळात तो वाढू नये म्हणून तरी पावले उचलता येतील. आज जे इतक्या प्रकाराने सरकार कर आकारणी करते त्याऐवजी मोजक्याच म्हणजे केंद्र, राज्य, व पालिका अगर पंचायत यामार्फत एकाच प्रकारचा कर ठेवावा. व नाहीतरी जागतीकरणामुळे सर्व व्यवहार सोपे करण्यासाठी सर्वच खुले करावे लागेल अशी हवा निर्माण केली होती त्याचा फायदा घेत सर्व बंधने शिथिल करावी पण मग वाईट उद्योग वाढतील म्हणून सर्वांना परवाने द्यावेत व त्या उद्योगावर नियंत्रण ठेवावे. म्हणजे निदानपक्षी नवीन भर तरी पडणार नाही.   

हे जरी झाले तरी भ्रष्टाचाराने पैसे मिळवून निवडणूक जिंकता येते असे दिसू लागल्यामुळे, आज समाजसेवक म्हणून जे आहेत त्यापैकी कितीजणांना पाहूनच लोक मत देतील? त्यासाठी ते निवडणूक काळ सोडल्यास इतर वेळी ते समाजसेवा काय करतात हा प्रश्नच आहे म्हणून मग त्यांना संरक्षण लागते किती राजकारणी नेते जनतेचे नेते बनु शकतील हा प्रश्नच आहे.