व्हिके
आपण ज्यावेळी आपले अनुभव लिहिता त्यावेळी ते लेखन परिणामकारक असते. ज्यावेळी अनुभवाव्यतिरिक्त लिहिता ते तितकेसे पटत नाहीत. आपल्याला आलेले अनुभव दुर्दैवी आहेत. त्यामागे जातीयवाद, भाई - भतीजा वाद (नेपोटिजमला हिंदी शब्द), तुमच्या सूचनांमुळे लोकांची वरकमाई बंद होण्याची शक्यता अर्थात संस्थेच्या हितापेक्षा व्यक्तिगत लाभ/स्वार्थ महत्त्वाचा वाटणे या प्रवृत्ती आहेत. कुठल्या प्रकारचे शिक्षण घेतले असता मनुष्य नीतीमान होईल?
शिक्षणामध्ये प्रॅक्टिकल शिक्षणाला असायला हवे तितके महत्त्व नाही हा भागही पटण्यासारखा आहे.
बाकी मी भारतात १९७७-८२ काळात कॉलेजात असताना सेमिस्टर पद्धतीने शिकलो आणि मला या पद्धतीचा अतिशय फायदा झाला. मुख्य म्हणजे वर्षभर सातत्याने अभ्यासाची सवय लागली. सेमिस्टर पद्धतीमुळे प्रत्येक पेपरच्या कमीतकमी दोन युनिट टेस्टस, एक मिडसेमिस्टर परीक्षा आणि एक एंडसेमिस्टर परीक्षा अश्या चार परीक्षा द्याव्या लागत. एफवाययबीस्सीच्या पहिल्या वर्षाच्या दोन्ही सेमिस्टरला प्रत्येकी चार विषय आणि एकेका विषयाचे प्रत्येकी तीन पेपर्स. प्रत्येक पेपरच्या वर सांगितलेल्या परीक्षा. त्यामुळे अक्षरशः जीव मेटाकुटीला येत असे. पण याचा पुढच्या आयुष्यात फायदा झाला हे खरे. इथे अमेरिकेतही सेमिस्टर पद्धत अजून सुरू आहे.
सबंध वर्षामध्ये एक सहामाही आणि एक वार्षिक परीक्षेपेक्षा (ज्यामध्ये शेवटचे महिना पंधरा दिवस अभ्यास करूनही चांगले मार्क्स मिळवता येतात) हे खूप चांगले आहे असे वाटते.
विनायक