नीतीमत्ता हे नाव व त्याविषयीचे नियम प्राथमिक ते माहाविद्यालयीन शिक्षणात नाही. हा शब्द उच्चारणे म्हणजे तुम्ही पेंशनर आहात का म्हणून विचारले जाते.  कोणत्या शतकात वावरता आहात ? वगैरे.

तुम्ही म्हणता ती पद्धत तर चांगलीच आहे, पण मी  तांत्रीक शिक्षणातल्या सेमीस्टरचा फरक सांगितला नाही.

जेमतेम चार महिने कॉलेज तर तीन ते चार महिने एका कंपनीत जाउन काम करणे ह्यात अपवाद वगळता फार मोठ्या प्रमाणात  आजही चालू असणारे गोंधळ मी अनुभवले आहेत जे विद्यार्थ्यानि सांगितले होते. जे माझ्या मुलाने व त्याच्या मित्रांनी अनुभवले आहेत.

बीन पगारी नोकर मिळाल्या सारखा वापर,  घरापासून जवळ कंपनी मिळवण्या करता पर्यवेक्षकाला पैसे देणे. कंपनीत न जाता प्रमाणपत्र मीळवणे, वगैरे. 

माझा मुलगा ऑटोमोबाईल इंजीनीरींग असे गोंडस नाव असलेले शिक्षण घेत होता, त्याला मारूती सर्व्हीस स्टेशनला पाठवले होते. तिथे ऑईल बदलणे, रॅडीएटर पाणी पातळी बघणे, चाकातील हवेचा दाब बघणे हे काम करून घेतले होते.  व्हिल बॅलन्स व सेटींग सारखी महत्वाची कामे व दुरुस्ती भागात कधीच नेले नाही. पुढल्या वर्षी हिरो होंडाच्या दुचाकी सर्व्हीस सेंटरला पुन्हा हाच अनुभव आला. हा दुवा वाचा

एकंदरीत काय तर कागदावर सगळे नीट नेटके परंतु प्रत्यक्षात सगळा घोळ.