अगदी खोलात शास्त्रीय विचार केला तर असे नियम सापडतीलही, पण भाषाशरणाः वैयाकरणाः असं म्हणतात, ते काही खोटं नाही. म्हणजे व्याकरणाप्रमाणे भाषा ठरत नसते तर भाषेप्रमाणे व्याकरण ठरत असते. बोलताना लोक जे वापरतात त्याचं सामान्यीकरण करूनच नियम बनतात. आणि बहुतेक भाषिक नियम लवचिक असतात. फटा, डाळा हे स्त्रीलिंगी अनेकवचनी शब्दही मी ऐकले आहेत. फटी - फटा / डाळी - डाळा हा फरक अर्थातच प्रदेशनिहाय आहे. आणि हे दोन्ही वापर होतात. त्यात योग्य - अयोग्य / चूक - बरोबर असा भेदभाव करणं अशक्य आहे. अशा शब्दांना नियमात बसवणे शक्य नाही. आणि असले तरी शहाणपणाचे नाही असे वाटते.........