व्याकरणाच्या पुस्तकात असा नियम सापडला :
"अ-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन केव्हा आ-कारान्त तर केव्हा ई-कारान्त होते. य नंतर ई आल्यास उच्चारात य लोप पावतो : गाय-गायी-गाई; सोय-सोयी-सोई."
नियमातच दोन पर्याय असल्यामुळे प्रचलित वापरानुसार अ-कारान्त स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन करावे. कॉमेंट हा शब्द मराठीच्या अंगणात हल्लीऱ्हल्लीच बागडू लागल्यामुळे त्याच्या मराठी अनेकवचनाविषयी अद्याप एकमत नाही. (अभिप्राय, मत, टिपणी, प्रतिसाद इत्यादी शब्द मराठीत उपलब्ध असताना कॉमेंट मराठीत स्वीकारावा हे व्यक्तिशः मला पटत नाही. )