लाट - लाटा, वाट - वाटा, खाट - खाटा, माळ - माळा, वेळ - वेळा  तसे कॉमेंट - कॉमेंटा

की

गोष्ट - गोष्टी, फट - फटी, कमान - कमानी, वेल - वेली, चाल - चाली, डाळ - डाळी तसे कॉमेंट - कॉमेंटी ?


ह्यासंबंधीचे काही नियम असतील तर बरेच आहे पण मला वाटते जो प्रयोग रूढ होतो तो चालू राहत असावा.  यातही थोडी अडचण आहेच. लाट-लाटी म्हटले तर खटकेल. तसेच गोष्ट-गोष्टा म्हटले तरीही खटकेल पण बैठक-बैठका, बैठक-बैठकी असे दोन्ही ऐकले आहे आणि मला त्यातील कोणतेच खटकत नाही. जोरबैठका मध्ये बैठका आणि कार्यकारी समितीच्या बैठकी असा काही संकेत आहे की काय?

दुसरा मुद्दा जास्त मूलभूत आहे. इंग्रजी शब्दांवर मराठी व्याकरणाचे संस्कार करताना त्याचे लिंग कसे ठरवायचे? 'ह्यावरून आठवलं' मधील 'लिंग कोण ठरवणार? ' ही चर्चा वाचावी. मी शाळेत असताना रायडर(rider) 'तो' की 'ती' यावरून विद्यार्थ्यांमध्ये रण माजत असे!