दामल्यांचे मराठी व्याकरणजालावर वाचायला मिळते. अकारान्त स्त्रीलिंगी शब्दांच्या अनेकवचनासंबंधातील त्या पुस्तकातील काही  भाग असा :
(अनेक पदरी लिप्यंतर आणि मांडणीतील यांत्रिक बदल ह्यामुळे काही चुका राहून गेलेल्या (आणि नव्याने निर्माण झालेल्या! ) आहेत, त्या बद्दल क्षमस्व. मूळ पुस्तकातील हे पानसंदर्भासाठी वाचावे. )

()अकारान्त स्त्रीलिंगी नामें

ह्या नामांच्या अनेकवचनांत तीन प्रकार आहेत. कांहींचें अनेकवचन आकारान्त होतें; यांस दादोबा आतेचा गण असें म्हणतात. कांहींचें अनेकवचन ईकारान्त होतें; यांस दादोबा भिंतीचा गण असें म्हणतात. आणि कांहींचें अनेकवचन दोन्ही प्रकारांनीं होतें; यांस दादोबा झेंपेचा गण असें म्हणतात. तेव्हां या तीन गणांत कोणकोणते शब्द येतात तें पाहूं.

प्रकार पहिला ः आतेचा गण( आत-आता ) ः-

()जे अकारान्त स्त्रीलिंगी शब्द मूळ संस्कृत आकारान्त स्त्रीलिंगी शब्दांपासून उत्पन्न झालेले आहेत, त्यांचीं अनेकवचनें याप्रमाणें आकारान्त होतात.

संस्कृत

मराठी

संस्कृत

मराठी

मूळ शब्दए० व०अ० व०मूळ शब्दए० व०अ० व०
अत्तिकाआतआताईु्र्१ा्याइरा, ईरइरा
मालामाळमाळाधुर-राधूरधुरा
भाषाभाष, भाकभाषा, भाकासुरासूर (कोंकण)सुरा
लिक्षालीखलिखादूर्वादुरवदुरवा
शिराशीरशिरानौकानावनावा
रेखारेघरेघालालालाललाला
जटाजटजटाकोकिलाकोकिळकोकिळा


बटबटा (२९८)वेलावेळवेळा
रंडारांडरांडाशिलाशीळशिळा
ननांदा (दृ)नणंदनणंदाकक्षाकांखकांखा
समिध-धासमीधसमिधाजिह्वाजीभजीभा
स्नुषासूनसुनाधाराधारधारा
शुक्तिकाशिंपशिंपाखट्वाखाटखाटा
शतपुष्पाशेपशेपाआम्लाआंवआंवा
गुंफागुंफगुंफाअमावास्याअंवसअंवसा
ताम्रिकातांबतांबाइष्टकाईट, वीटईटा, विटा
माता (तृ)मायमायाकणिकाकणीककणका
करकागारगारागुंजागुंजगुंजा (२९९)
तारातारताराचिंचाचिंचचिंचा
चीराचीरचिरालाक्षालाखलाखा
जंघाजांघजांघालालसालालूचलालचा
झंपाझांपझांपालज्जालाजलाजा
तृषातहानतहानालत्तालात-थलाता-था
तृतीयातीजतिजासीमाशींवशिंवा
दंष्ट्रादिदाीशय्याशेजशेजा
निद्रानीजनिजाशर्करासाखरसाखरा
पौर्णिमापुनवपुनवासंध्यासांजसांजा
द्वितीयाबीजबिजाशालासाळसाळा
भिक्षाभीकभिकाशुंडासोंडसोंडा
बुभुक्षाभूकभुकाइ०. इ०. इ०.
रक्षाराखराखा




इतकी मोठी यादी देण्याचें कारण असें कीं, संस्कृत व्युत्पत्तीचें मराठी भाषेच्या विद्याथ्र्यांस असेलच असा नियम नाहीं. म्हणून संस्कृतानभिज्ञ मराठी विद्याथ्र्यास नुसत्या नियमापेक्षां या यादीचाच अधिक उपयोग होईल. (३००)

टीप -अनेकवचनामध्यें अंत्यास व उपांत्यास कांहीं विकार होतात, हें समीध-समिधा, सून-सुना इ० उदाहरणांवरून वाचकांचे लक्षांत येईलच. यांसंबंधाचे सर्व नियम या अध्यायाचे अखेरीस देण्यांत येतील.

अपवाद ः-हरिद्राऱ्हळद; कामला-कावीळ, कामीण; भल्लुका-भालूक; ह्यांचीं हळदी, कावळी, कामणी, भालुकी अशीं अनेकवचनें होतात.

()जे अकारान्त स्त्रीलिंगी मराठी शब्द मूळचे ऊकारान्त आहेत, त्यांचेंही अनेकवचन आकारांतच होतें.

संस्कृत मूळ शब्द ःपाचूखजूरखजूरविद्युत (प्रा० विज्जू) इ०

मराठी ए० व० ःपाचखाजखरूजवीज इ०

अ० व० ःपाचाखाजाखरजाविजा इ०

()जे अकारान्त स्त्रीलिंगी मराठी शब्द मूळच्या संस्कृत अन्य लिंगी शब्दांपासून निघाले आहेत, ते आतेच्याच गणांत येतात.

संस्कृत

मराठी

संस्कृत

मराठी

मू० श०लिंगए० व०अ० व०मू० श०लिंगए० व०अ० व०
शाकन०शाक-खशाका-खाशपथपु०शपथशपथा
लवंगन०लवंगलवंगामधून०मधमधा
काचपु०काच, काचा, बाष्पपु०वाफवाफा



कांचकांचाऊष्मापु०ऊबउबा
भुजपु०भूजभुजालोमपु०लव, लवा,
शोथपु०सूजसुजा



लंवलंवा
वाटपु०वाटवाटाव्यामपु०वांववांवा
प्रभातन०पहाट, पहाटा, कपिशपु०कावकावा



पहांट, पहांटाकच्छपु०कांसकांसा
कटपु०कडकडासत्काल,




षंडपु०सांडासांडसुकालपु०सकाळसकाळा
शाणपु०साण, साणा, तिलकपु०तीटतिटा



सहाणसहाणा (३०१)क्लेशपु०किळसकिळसा
लशूनन०लसूणलसणाटंगपु०टांगटांगा
वस्तून०वस्तवस्ताइ०.


इ०. इ०.

()जे अकारान्त स्त्रीलिंगी शब्द धातूंपासून विकार न होतां किंवा कांहीं अल्प विकार होऊन आलेले आहेत ते आतेच्याच गणांत येतात. जसें ः- अटक, चटक, लटक, जाग, टीप, अडक, हाक, पिंक, फुंक, रीघ, खाच, झीज, रीझ, लाट, भोवंड, भीड, चीड, तान, चूक, खीज, झडप, करप, झोंप, धोप, चार, चीर, खडाव, जाणीव, नेणीव, धांव, किळस, चिळस, भोंवळ इ०.

अपवाद ः-उकड, उसळ, उचल, उमळ. ह्या शब्दांचीं अनेकवचनें ईकारान्त होतात; म्हणजे ते दुसऱ्या भिंतीच्या गणांत जातात.

()ह्यांशिवाय जे कांहीं अव्युत्पन्न अकारान्त स्त्रीलिंगी शब्द आहेत, त्यांचेंही अनेकवचन आकारांतच होतें.

टीकबूजमजलढेंगटींचमातरीपडांक
टांगपैजगजलमेंगबाजगप्पखेपताजीम
खारीकनरदड३०२)वेंगमोटचीपचूळचुणूक
कुळीकगंजीफडांगशेंगपेंठधापलांचचितंग
फिरंगपावतोफनजरकमररयतमोहीमरणंग
किलचहावशालसदरकंबरविलायतजिन्नससांपट
ढेलचखेंवताजकवरकुमकतरफहुरूपफट
आउजउणीवचीजकसरमसकतलफहाकसावट
खाचटरेंवफौजतसरशिल्लकतशरीफसूणशिळट
रांडमुंडसडकईजजंजीरतारीखगुरावआणबांबूट
मसूरशिकलकैदअक्कलगरजतलबशिळकआगोठ
कवतालीमफामशक्कलदरजरकमडगकुपट
मावबोजवामतक्षीमताऊजसिकलकणंगधापट

कोरट होरट इ० इ० इ० इ० इ०.

प्रकार दुसरा ः भिंतीचा गण( भिंत-भिंती ) ः-

()मूळ इकारान्त अथवा ईकारान्त संस्कृत शब्दांपासून जे अकारान्त स्त्रीलिंगी मराठी शब्द आले आहेत, त्यांचें अनेकवचन ईकारान्त होतें.

संस्कृत

मराठी

संस्कृत

मराठी

मूळ शब्दए० व०अ० व०मूळ शब्द
अ० व०
भित्तीभिंतभिंती (३०३)कुस्तुंबरीकोथिंबीरकोथिंबरी
पूगफलीपोफळपोफळीखनीखाणखाणी
चालनीचाळणचाळणीचुल्ली(ल्ली)चूळचुळी
पुष्करिणीपोखरणपोखरणीद्रोणी(क्ड्ढड्ढद्ध)द्रोणद्रोणी
बदरीबोरबोरीधूली(ली)धूळधुळी
कदलीकेळकेळीपंक्तीपंगतपंगती
जातीजातजातीपुत्रीपोरपोरी
गतीगतगतीमुष्टीमूठमुठी
रीतीरीतरीतीवर्त्तीवातवाती
बुद्धीबुद्धबुद्धीवेल्लीवेलवेली
तिथीतीथतिथीसपत्नीसवतसवती
भ्रांतीभ्रांतभ्रांतीशुंठी(ठी)सुंठसुंठी
कुक्षीकूसकुशीराशी पु०रासराशी
कुट्टनीकुंटणकुंटणीग्रिंथ पु०गांठगांठी
कुठारीकुऱ्हाडकुऱ्हाडीअगि्न पु०आगआगी
कुमारीकुवारकुवारी



ड३०४)

()वनस्पतींचीं अकारान्त स्त्रीलिंगी नामें भिंतीचेच गणांत येतात.

बोरबाऊटकेळनांदेटनारळजास्वंद
तगरनांदरूखभारंगवावडिंगभोंकरमहाळुंग
सुरंगआवोलनारिंगगुलवासकौठशिताफळ
जांभूळरामफळडाळबिंइ०इ०इ०

अपवाद ः-चिंच, गुंज, शाख, दुरव इ०. हे पहिल्या प्रकारांत म्हणजे आतेच्या गणांत येतात.

()ईण-प्रत्ययान्त स्त्रीलिंगी शब्द भिंतीच्याच गणांत येतात. जसें ः- वाघीण -वाघिणी, वाघणी; कोळीण-कोळणिी, कोळणी; सोनारीण-सोनारिण, सोनारणी; इ०.

()आणखी कांहीं अकारान्त स्त्रीलिंगी शब्द, जे मागल्या परिगणनेंत येत नाहींत, ते व विशेषेंकरून तीन अक्षरांहून अधिक अक्षरांचे, हे सर्व भिंतीच्या गणांत येतात.

भेटभेटी
ओळखओळखी
पावदूकपावदुकी
पावधूकपावधुकी
तकरारतकरारी
भानगडभानगडी इ०
विहीरविहिरी
खटपटखटपटी
बसकटबसकटी
तबलकतबलकी
तजवीजतजविजी
सासुरवाडसासुरवाडी इ०
घोरपडघोरपडी
उसनवटउसनवटी
तारंबळतारंबळी
सोइरगतसोइरगती
खरखटवळखरखटवळी
अदलाबदलअदलाबदली इ०

प्रकार तिसरा ः झेंपेचा गण( झेंप - झेंपा, झेंपी ) ः-

()णूक-प्रत्ययान्त सर्व शब्द यांत येतात. जसें ः- करमणूक-करमणुका, करमणुकी; वागणूक-वागणुका, वागणुकी; जाचणूक-जाचणुका, जाचणुकी; इ०.

()आणखी या अकारान्त स्त्रीलिंगी शब्दांचीं अनेकवचनें आकारान्त व ईकारान्त अशीं दोन्ही प्रकारचीं आढळतात, ते येणेंप्रमाणें ः- (३०५)

शालपरातटकमकएरजारचोंचखुरनीससोयरीक
ढालकटारतसबीरअखबारकोरडीकवखारबंदूक
मशालतरवारवरातउघडीकभरताडखांचसंदूक
पखालसुरवारवळविंजआगळीकखसखसपुरशीसखबर
अहवालचकमकतशरीफइजारहुरमूजतजवीजइ०

एवंच अकारान्त स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचनांसंबंधानें कालदेशवर्तमानानुसार मतभेद होण्याचा कांहीं ठिकाणीं बराच संभव आहे; पण त्यास व्याकरण काय करणार? जोंपर्यंत भाषेस स्थैर्य आलें नाहीं तोंपर्यंत व्याकरण संदिग्धच राहणार.