हे नियम इथे सविस्तर दिल्याबद्दल आभार. दादोबा आतेचा गण, दादोबा भिंतीचा गण आणि दादोबा झेंपेचा गण ही नावे चमत्कारिक आहेत. वाचून गंमत वाटली. आता ही नावे कुठून आली असावीत असा प्रश्न पडला. दादोबा कोण, त्यांच्या आतेचा आणि भिंतींचा व्याकरणाशी काय संबंध आणि झेंप म्हणजे काय असेही प्रश्न पडले.

मला अ चा आ स्वाभाविक वाटत नाही. कॉमेंटा पेक्षा कॉमेंटी हे माझ्या कानाला जास्त बरे वाटले. पॅन्ट चे अनेकवचन पॅन्टापेक्षा  पॅन्टी असे सहज करणारे (ज्यांना पँटीचा वेगळा अर्थ आहे हे माहीत नसणारे, वा माहीत असूनही कानास जास्त बरे वाटत असल्याने तसे करणारे) जास्त भेटतात. स्कूटरचे अनेकवचन सहज स्कूटरी असे केले जाते, स्कूटरा असे नाही. मात्र बँक चे सहज बँका होते, बँकी नाही.