मला अ चा आ स्वाभाविक वाटत नाही. कॉमेंटा पेक्षा कॉमेंटी हे माझ्या कानाला जास्त बरे वाटले. पॅंट चे अनेकवचन पॅंटापेक्षा  पॅंटी असे सहज करणारे (ज्यांना पँटीचा वेगळा अर्थ आहे हे माहीत नसणारे, वा माहीत असूनही कानास जास्त बरे वाटत असल्याने तसे करणारे) जास्त भेटतात. स्कूटरचे अनेकवचन सहज स्कूटरी असे केले जाते, स्कूटरा असे नाही. मात्र बँक चे सहज बँका होते, बँकी नाही.

हे विचारात घेण्यासारखे आहे. कोठे आ जास्त चांगला वाटतो, कोठे ई चांगली वाटते अशी निरीक्षणे करून, अनुमान काढून (दादोबांप्रमाणे!) आपल्यालाही काही नव्या नियमाची भर घालता येते का पाहावे, असे सुचवावेसे वाटते.

(मुळात मी स्वतः कॉमेट शब्द पुल्लिंगी वापरतो. कदाचित अगदी सुरवातीला टोमणा ह्या अर्थी कॉमेंट शब्द ऐकल्यामुळे असे झालेले असावे, असे वाटते. )