फाइल - फायली
साइट - सायटी
कार कारी (? )

पर्स - पर्सा (? )
सिस्टिम - सिस्टिमा (?)

बस - बस (? )

ज्या अकारान्त स्त्रीलिंगी शब्दांचे अनेकवचन ईकारान्त होते ते शब्द विभक्तीप्रत्यय लावून वापरायचा झाल्यास विओभक्तीप्रत्ययापूर्वी होणारा त्या शब्दांतील बदल आणि त्यांचे अनेकवचन यांत साम्य आहे असे दिसते. उदाहरणार्थ -
डाळ - डाळी : डाळीचे, डाळीला वगैरे
गोष्ट - गोष्टी : गोष्टीला, गोष्टीचे, गोष्टीने वगैरे.

मात्र, ज्या अकारान्त स्त्रीलिंगी शब्दांचे अनेकवचन आकारान्त होते, त्यांच्यात असे साम्य नाही. उदाहरणार्थ -
माळ - माळा : माळेला, माळेचे वगैरे
लाट - लाटा : लाटेने, लाटेचे वगैरे.

तेव्हा असा विचार मनांत आला, की इंग्रजी शब्द मराठी असल्याप्रमाणे वापरताना त्यांचे अनेकवचन आपण त्यांना विभक्तीप्रत्यय कसा लावतो त्यावर अवलंबून असावे का? उदाहरणार्थ, स्कूटरीवरून गेलो, बँकेत काम होते, कागद फायलीत लावला, अमक्या सायटीवर माहिती सापडेल, पैसे पर्सेत आहेत, वगैरे. (पण बसमध्ये बसलो, म्हणून बस चे अनेकवचन बस असेच ? )