स्मशानभूमीत काष्ट विकणे असेल पेशा जया कुणाचा
जगावया तो करी प्रतिक्षा कुणी उद्याला मरावयाची
तपास करण्या लवाद बसले तरी खुशीतच लबाड कोल्हे
लवाद म्हणजे विशेष संधी उसात त्यांना लपावयाची
विकार "निशिकांत"ला जडावा दवात ओल्या कळ्या फुलांचा
पहाट आता कवेत घ्यावी मनात उर्मी भिजावयाची ... सुंदर , मतलाही आवडला !