बसचे बशी असे अनेकवचन आणि सामन्यरूप झाले असते, पण केवळ बशी नावाची एक वेगळी वस्तू असल्याने तसे करत नसावेत. बशीने प्रवास केला असे ऐकले की उडती तबकडी डोळ्यासमोर येते. ग्रामीण भागांत मात्र बशी आणि बशीने असे प्रयोग सररास ऐकायला मिळतात.
दामले म्हणतात त्याप्रमाणे तीन अक्षरी अकारान्त स्त्रीलिंगी शब्दाचे अनेकवअनी रूप ई लावूनच करायचे. त्यामुळे स्कूटरी, फायली, सायटी आणि कॉमेंटी हे नियमाप्रमाणेच आहेत. दोन अक्षरी शब्दांत मात्र तो शब्द आतेच्या, की भिंतीच्या, की झेपेच्या गणात मोडतो ते पाहूनच मग अनेकवचन करावे असे दामल्यांच्या व्याकरणात सांगितले आहे, असे दिसते आहे.