मराठीत संयुक्त वाक्य करताना गौण वाक्यांश अगोदर आणि प्रधान वाक्यांश नंतर येतो. लेखात ही प्रथा न पाळता केलेले लिखाण वाचकाला खटकते.
उदा० "एक ताऱ्याचा शोध लागला आहे ज्याच्या मंडळातील " हे वाक्य "ज्याच्या मंडळातील एका ग्रहावर जीवसृष्टी आहे ... अशा एका ताऱ्याचा शोध लागला आहे" असे हवे.
"ह्या भेदांच्या आणखी अनेक नवीन शब्दांच्या जे आपल्या करिता नवीन आहेत" हे वाक्य "जे आपल्याकरिता नवीन आहे अशा भेदांचे आणखी काही शब्द... " असे हवे. अशी आणखीही वाक्ये आहेत.
दुसरा मार्ग म्हणजे जो, ज्यांनी, जिथे असले शब्द वापरण्यापूर्वी पूर्णविराम देणे आणि नवीन वाक्य अनुक्रमे तो, त्यांनी, तिथे या शब्दांनी सुरू करणे. पण शक्यतो. प्रधान वाक्यांश गौण वाक्यांशाच्या अगोदर येऊ देता कामा नये.