ही नित्य शुद्धी भाषेची मुळीच नाही, ती करण्याची माझी पात्रताही नाही. पण ज्यांना ती आपलीच जबाबदारी असल्याच व्रुथा अभिमान किंवा गंड असतो, त्यांच्याशी आमची नित्याची लढाई सदोदित सुरू आहे.. ‌शुद्धलेखन हा आमचा प्रांत नाही, विषयाच्या अनुषंगानी हेतू आणि आशयाची शुद्धता हा आमचा प्रांत.आंम्ही जन्मानी मराठी असलो, तरी खरं म्हणजे मराठीतच आमचा जन्म झालेला आहे. याची नम्र जाणीव हेच आमचं मुल्य. त्यामुळे भरपुर नवीन विषय लिहित बसण्यापेक्षा, विषयात नवीन भर घालण्याकडे आमचा कल. विशेषतः सामाजिक विषयांकडे जास्त ओढा, पण विनोदी, मार्मिक, विडंबन काव्य/लेख ई. प्रांतात जमेल तितका सहभाग... याउपर आमची ताकद नाही... ती वाढावी म्हणून अश्या संकेत स्थळांवर सहभाग.