आपला व्य. नि . मिळाला. वरील लेख वाचला. आपण लिहिलय की  सर्व भासमान आहे. तसच अनुभव , सत्य, भ्रम निराकार, साकार  इत्यादी विवेचन
तशी दृष्टी असलेल्या माणसाला विचार करण्यास ठीक वाटतात(म्हणजे आपल्यासारखी , या क्षेत्रातली माणसं), परंतु आम्हाला हे कळत असलं
तरी इतकी देहवुद्धी आहे की सध्याचा भ्रमच गोड वाटतोय, काय करणार ? त्यामुळे आम्ही आमची स्थिती अजिबातच सोडायला तयार नाही. याचा
अर्थ तुमचं लिखाण निरूपयोगी आहे असं नाही. त्या पातळीला असलेल्या माणसाला नक्कीच उपयुक्त ठरेल, किंवा आमच्यासारख्याला जर काही
इमर्जन्सी (मराठी शब्द सुचला नाही )आली तर काय करावं म्हणून नक्कीच उपयोगी आहे असं मला तरी वाटतं. खरोखरीचा अध्यात्मवादी (म्हणजे
आपल्यासारखा) एखादाच असतो. बहुतेक सगळे "सोयिस्कर अध्यात्मवादी " आहेत, असं वाटतं. नवीन आणि अनोळखी भ्रम घेऊन जगण्याची
निदान मला तरी भीती वाटते. असो. आपण लक्षात ठेऊन व्य. नि. पाठवलात त्याबद्दल , आभारी आहे. लेख नेहेमीप्रमाणे चांगला आहे. अशा
लेखनाकरिता आपल्याला पुढील लेखनासाठी शुभेच्छा देणं मला तरी बरोबर वाटत नाही. राग मानू नये.