गजल आवडली... 

करून झाली नवीन व्याख्या सुखात जगणे कसे असावे
तुझ्या सुखास्तव निरांजनासम हवी तयारी जळावयाची

पुरे पुरे हे टुकार जगणे उजेड मजला नको अता पण
दिव्यास आज्ञा कुणी करावी? जगात माझ्या विझावयाची

स्मशानभूमीत काष्ट विकणे असेल पेशा जया कुणाचा
जगावया तो करी प्रतिक्षा कुणी उद्याला मरावयाची

या ओळी फारच छान जमल्या आहेत...