बक्षीस शब्दाच्या मुळाचा शोध घेतो आहे. भिक्षाशी त्याचा सरळ संबंध नसावा. फार्सीत बख़्शीदन नावाचे क्रियापद आहे. त्यापासून बख्शना हे क्रियापद हिंदीत. बख्शीश हा शब्द फार्सीतही आहे.
जसा परवरिश(प्रतिपाळ) हे नाम परवर्दन(पाळणे) ह्या क्रियापदापासून तयार झाले आहे तसेच बख़्शीदन बख्शीश त्यावरून मराठीत बक्षीस. परवरदन पासून ईश्वरासाठी परवरदिगार (पाळणारा) हा शब्द आला आहे.
गोळीबारीतला बारी हा प्रत्यय फार्सीतल्या बारीदन(बरसणे) पासून आला आहे.
बस्तान, बस्ता हे शब्द बस्तन(बांधणे) ह्या क्रियापदापासून तर उस्ताद हा उस्तादन(उभे राहणे) ह्या क्रियापदापासून.
तूर्तास एवढेच.
चित्तरंजन