कॉमेंट हा इंग्रजी शब्द असल्यामुळे आणि बारकाईनी विचार केला तर तो 'अ'कारान्त नसून 'ट'कारान्त असल्यामुळे त्याचं मराठी अनेकवचनही कॉमेंट असंच केलं तरी कानाला खटकणार नाही. उदाहरणार्थ, त्याच्या विधानावर अनेकांनी अनेक कॉमेंट केल्या. किवा मला त्याच्या मतावर काहीही कॉमेंट करायच्या नाहीत.
किंवा मूळ इंग्रजी शब्दांचं अनेकवचन इंग्रजीच्या नियमाप्रमाणे करण्यात यावं असंही ठरवून त्याचं मराठी व्याकरणात वेगळं परीशिष्ट देण्यात यावं.