कॉमेंट...शब्द...'अ'कारान्त नसून 'ट'कारान्त असल्यामुळे...

शब्दास अकारान्त, इकारान्त, ईकारान्त, आकारान्त, उकारान्त, वा ऊकारान्त म्हटले जाते ते त्याच्या शेवटच्या अक्षरावरून नव्हे तर स्वरावरून. उदा. कॉमेंट = कॉमेंट् + अ , म्हणून कॉमेंट अकारान्त. धडाडी = धडाड् + ई, म्हणून ईकारान्त इत्यादी.

किंवा मूळ इंग्रजी शब्दांचं अनेकवचन इंग्रजीच्या नियमाप्रमाणे करण्यात यावं असंही ठरवून त्याचं मराठी व्याकरणात वेगळं परीशिष्ट देण्यात यावं. 

मराठीत अनेक भाषांमधील शब्द येतात, वापरले जातात. परभाषेतून आलेला प्रत्येक शब्द त्या त्या भाषेच्या नियमानुसार चालवायचा झाल्यास मराठी व्याकरणाहून परिशिष्टेच मोठी होतील. मराठी भाषकांना अनेक भाषा (त्यांच्या व्याकरणाच्या नियमांसहित! ) शिकाव्या लागतील. हे व्यवहार्य नसल्यामुळे आयात केलेल्या शब्दांचे मराठीकरण करून मराठीच्या नियमांनुसार चालवणेच योग्य आहे.